खाद्यभ्रमंती पॅटर्न

खाद्यभ्रमंती पॅटर्न मुळे राज्यातील आणि देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांची डोकेदुखी कमी होईल. अतिक्रमण ही
कधीही न थांबणारी गोष्ट आहे़. पण या पॅटर्नमुळे ती डोकेदुखी न होता उत्पन्नाचे साधन होईलच पण स्थानिक स्वराज्य
संस्थेला अतिक्रमण सिद्ध करणे सोपे जाईल आणि कधीही काढायचे झाल्यास त्वरित उचलून अतिक्रमित जागा रिकामी
करता येईल. तसेच हे करताना कोणत्याही स्वरूपात मालमत्तेचे नुकसान होत नाही. त्यामुळे नुकसान भरपाई द्यायचा
विषयच येत नाही.

भाडेकरू आणि व्यावसायिक यांना तर खाद्यभ्रमंती पॅटर्न ही तर पर्वणीच म्हणावी लागेल. कारण यात कोणत्याही
प्रकारचे बांधकाम करावे लागत नाही. त्यामुळे वहिवाट दाखवणे म्हणावे तितके सोपे होणार नाही. फक्त तात्पुरत्या
स्वरूपात जागा भाडेतत्वावर देण्यात येईल आणि नको तेंव्हा संबंधित प्रॉपर्टी उचलून बाजूला ठेवता येईल. अनेक
न्यायालयीन कटकटी कमी होतील व जागा मालक टेन्शन फ्री राहतील. जागा मालक आणि भाडेकरू यांना खाद्यभ्रमंती
पॅटर्न आदर्शवत राहील याबाबत शंका नाही.

स्वतःचे घर निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे जागा खरेदी. राज्यातील जागांचे दर गगनाला भिडले
आहेत. ते आता सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेले आहेत. खाद्यभ्रमंती रेडी होम्स मुळे गाडी किंवा वस्तू खरेदी करतो तसे
कमीत कमी तीन लाख रुपयांत सुद्धा घर खरेदी करता येईल आणि जागा भाडे तत्वावर घेऊन तेथे वास्तव्य करता
येईल. या संकल्पनेमुळे अनेक भारतीयांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करता येतील. भारत देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासातील ही
मोठी उपलब्धी असेल यात शंका नाही असे प्रतिपादन या संकल्पनेचे उद्गाते दीपक मांगले यांनी व्यक्त केले.

खाद्यभ्रमंती : अल्ट्रा मॉडर्न रेडी होम्स

अमेरिका, कॅनडा, जपान, स्वित्झर्लंड आदी देशासह अनेक प्रगत देशांमध्ये रेडी होम्स ही टेक्नॉलॉजी गेल्या कित्येक
वर्षांपासून वापरात आहे़. पण भारतात आतापर्यंत याबाबत जागरूकता निर्माण होऊ शकली नाही. पण गडहिंग्लज
येथील प्रतिथयश उद्योजक आणि पत्रकार दीपक मांगले यांच्या दूरदृष्टीतून खाद्यभ्रमंती इन्फ्रास्ट्रक्चर ने या कामी
पुढाकार घेतला आणि या खाद्यभ्रमंती अल्ट्रा मॉडर्न रेडी होम्स ची निर्मिती झाली.
कमीत कमी खर्चात मजबूत आणि टीकाऊ घरांच्या निर्मितीत अल्पावधीत अग्रगण्य ठरलेल्या खाद्यभ्रमंती
इन्फ्रास्ट्रक्चर;च्या अल्ट्रा मॉडर्न रेडी होम्स ने बांधकाम व्यवसायात नवा खाद्यभ्रमंती पॅटर्न रुजविला आहे़.

 

कुठे वापर होऊ शकतो :

रिसॉर्ट, कृषी पर्यटन केंद्र, हॉटेल्स, हॉटेल केबिन्स, पर्सनल थिअटर्स, फार्महाऊस, बांधकाम व्यावसायिक ऑफिस,
शोरुम्स, फ्रॅंचायझी मॉडेल डिसप्ले, टेरेस ग्लास सूट, रोड साईड बिझनेस, बंगलो, शेतघर, ऑफिस, गोडाउन, सिक्युरिटी
केबिन, स्पोर्टस गॅलरी, गार्डन ऑफिस किंवा किडस गार्डन होम.

वैशिष्ठ्ये :

▪️अतिशय मजबूत आणि टीकाऊ
▪️असंख्य आणि आकर्षक डिझाईन्स
▪️100 टक्के भूकंपरोधक वास्तू
▪️फायरप्रुफ, वॉटरप्रुफ, टर्माइटप्रुफ, इको फ्रेंडली, वेदर रेज़िस्टेंट.
▪️आवश्यक असल्यास साउंड प्रुफ करणे शक्य
▪️कमीत कमी निर्मिती खर्च
▪️आवड, गरज, जागेची उपलब्धता आणि बजेटनुसार वास्तूची निर्मिती
▪️एका जागेवरून दुसऱ्या जागी हलविता येतात.
▪️रिसेल करता येते.
▪️बांधकाम परवान्याची आवश्यकता नाही.
▪️समुद्र किनारी असलेल्या सीआरझेड किंवा प्रतिबंधित क्षेत्रात वापरण्यास अतिशय सोयीचे
▪️नदी काठी वास्तव्यास असणाऱ्याना अत्यावश्यक. वाहून जाणे, पडझड यांची चिंता नाही. उलट पूर स्थिती काही
क्षणात उचलून वर घेता येईल.
▪️अनेक किचकट परवाने तसेच गुंतागुंतीपासून सुटसुटीत
▪️बजेटनुसार स्टील, गॅल्व्हनाईज, लाकूड आणि सिमेंट यातील कोणत्याही मटेरिअलचा वापर करू शकतो.
▪️भाड्याच्या जागेत वापरायला अतिउत्तम. जागा मालक आणि भाडेकरू या दोघांनाही सुलभ
▪️आवश्यकतेनुसार इन बिल्ट कॅमेरा त्यामुळे असाल तिथून प्रॉपर्टीवर मोबाईलद्वारे लक्ष ठेऊ शकाल.
▪विक्री करून गुंतविलेले पूर्ण पैसे परत मिळविण्याची संधी.
▪️ज्यामुळे जागा आहे़ तशी ठेऊन फक्त वास्तू किंवा रेडी होम विकून पुन्हा आर्थिक उभारणी करणे सोयीचे आहे़.